astrology for career

काहीदिवसापूर्वीच मी “व्यवसाय/नोकरीचे मार्गदर्शन कुंडलीवरून” हा लेख प्रदर्शित केला. हा लेख अनेकांना आवडला आणि उपासने बाबतीत अजून स्पष्ट करून लिहावे अशी विनंती आली, म्हणून हा लेखन प्रपंच!

प्रत्येक व्यक्ती त्याचे प्रारब्ध घेऊन येतो. त्यानुसार त्याला चालू जन्मात सुख आणि दुःख भोगावे लागते. पूर्वपुण्याई चांगली पाठीशी असल्यावर जीवनातील अनेक कामे सोप्पी होतात, यश सहज मिळून जाते, संसार सुखाचा होतो इ . त्यातच गुरुकृपा असेल तर दुग्ध शर्करा योग असतो. काहींच्या पूर्वकर्मात पापकर्म अधिक असते. अशावेळेस कितीही प्रयत्न केले तरी यश हुलकावणी देतेच. संसारात कटकटी होतातच पण सांसारिक व्यक्तीचा रहाटगाडा ज्याच्यावर चालतो त्यावर सगळ्यात जास्त पूर्वकर्माचा प्रभाव जाणवतो, तो म्हणजे पैसा! सांसारिक मनुष्याचे सुख आणि दुःख हे त्याच्या देहभोगावर अवलंबून असतात आणि देहभोग सुरळीत राहावे ह्यासाठी पैसा आलाच.

सर्वांनाच हवाहवासा वाटणारा पैसा काहींना नोकरीच्या मार्फत येतो तर काहींना व्यवसाय करून मिळतो. काहींना खूप प्रयत्न करूनही कमी तर काहींना कमी प्रयत्नात जास्त मिळतो. कधी कधी एकच पद्धतीचे शिक्षण घेतलेले वेगवेगळे व्यवसाय करताना दिसतात. काहींना एकाच व्यवसायात यश येते तर काहीजण एकापेक्षा अनेक वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रात यशस्वी होऊन दाखवतात. नोकरी, व्यवसायातील यश हे लक्ष्मीरुपानेच आपल्या सर्व गरजा भागवते. हे कसे शक्य होते ह्याचे उत्तर व्यवसाय/नोकरीचे मार्गदर्शन कुंडलीवरून…! ह्या लेखात दिलेच आहे. त्या लेखाच्या शेवटी जे उपाय सुचवले होते, ते योग्य पद्धतीने कसे करावेत ते आता आपण पाहुयात.

उपासना कशासाठी?

प्रयत्न, कष्ट आणि नशीब ह्या त्रिसूत्रींवर व्यक्तीचे व्यावसायिक यश आणि त्या ओघाने पैसा अवलंबून असतो. प्रयत्न आणि कष्ट हे व्यक्तीच्या हातात आहे पण नशीब हे पूर्वकर्मनिर्धारित आहे. त्यापासून सुटका नाही. मग उपासना कशाला? एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि प्रारब्धात बदल नाही. पण उपासनेमुळे, उपास्यदेवतेची कृपा संपादन करता येते आणि भोगाची तीव्रता कमी करता येते किंवा वाईट भोग सुसह्य करता येतात. खरं तर उपासनेचे मूळ हे मनुष्याच्या मनाला समाधान देणे हे आहे. ज्या परिस्थिती आहोत त्या परिस्थिती समाधान मानून राहिल्यास उपास्यदेवता अजून खूष होते. सांसारिक माणसाला एवढ्यावरच समाधान मिळणे कठीण असते म्हणून आपल्या पूर्वजांनी ‘सकाम उपासना’ आणि ‘निष्काम उपासना’ असे भाग केलेत.

ज्या व्यक्तीला मनाचे समाधान, इष्टदेवतीची कृपादृष्टी हवी, प्रारब्ध सोसण्यासाठी मनोबल हवे,आणि जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका हवी त्या लोकांसाठी ‘निष्काम उपासना’ आहे.  

ह्याशिवाय ज्या व्यक्तींना संसारातील दुःखातून विश्राम हवा, प्रयत्नांना अपेक्षित यश हवे, जबाबदाऱ्या पूर्ण करता याव्यात एवढा पैसे हवा अश्या सांसारिक गरजा भागवण्यासाठी ‘सकाम उपासना’ आहे. सकाम उपासनेत संकल्प करण्याला फारच महत्व आहे कारण संकल्पाशिवाय सिद्धी नाही.  

ह्या लेखात आपण सांसारिक गरजा पूर्ण होण्यासाठी यश, कीर्ती आणि धन मिळवण्यासाठी लागणाऱ्या उपासना पाहणार आहोत. धन-धान्य समृद्धीसाठी, अपेक्षित यशातील अडथळे दार होण्यासाठी आणि शत्रूचे/प्रतिस्पर्ध्याचे त्रास कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपासना कशा करायच्या हे आपण पाहणार आहोत.

१) धन-धान्य समृद्धीसाठी उपासना –

बहुधा बऱ्याच जणांना ह्याचे उत्तर ठाऊक असेल. महालक्ष्मी उपासना ह्या साठी सर्वोत्तम समजली जाते. देवी लक्ष्मी चे “महालक्ष्मी अष्टक” ह्यासाठी फार प्रसिद्ध आहे. महालक्ष्मी अष्टक हे संकल्पयुक्त दिवसातून दोनदा म्हण्टल्यास महालक्ष्मीची नक्की कृपा होते. दर शुक्रवारी अकरा वेळा म्हणणे आणि अन्य वारी दोन वेळेस ( सकाळ-संध्याकाळ) एकेकदा म्हण्टल्यास नक्कीच महालक्ष्मीची कृपा होते.  

best astrologer in pune and karad

2) अडचणींवर मात करण्यासाठी उपासना –

खूप प्रयत्न करूनही अनेकवेळा यश हुलकावणी देत असते. लहान-सहान अडथळे निमित्त होत असतात. अशाप्रसंगी ह्या अडचणींच्यावर मात करण्यासाठी विघ्नहर्त्या गणेशाची उपासना करणे महत्वाचे ठरते. ह्याच्या जोडीला संकटमोचक अशा हनुमंताची केलेली उपासना हि लवकर फळाला येते हा अनुभव आहे. विशेष करून ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांनी एकवेळ शनीची उपासना नाही केली तरी चालेल पण हनुमंताची उपासना न चुकता करावी. गणपतीचे संकटनाशन स्तोत्र फारच प्रसिद्ध आहे. कामात सतत विघ्ने निर्माण होत असल्यास हे स्तोत्र संकल्पपूर्वक दररोज म्हंटल्याने लवकरच यश मिळते हा अनुभव आहे. विशेषकरून विद्यार्थीदशेतील व्यक्तींना चांगला लाभ मिळताना दिसतो. शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणे, परदेश शिक्षणात अडथळे येणे, परीक्षेत सतत अपयश येणे असे त्रास असल्यास हे स्तोत्र रामबाण इलाज आहे. नोकरी, व्यवसाय, आरोग्य, कर्तृत्व ह्यासंदर्भातील अडचणींवर मात करण्यासाठी मारुतीचे भीमरूपी हे स्तोत्र दररोज तिन्हीसांजेच्यावेळेस म्हणावे, दर शनिवारी मारुती मंदिरात जाऊन अकरा वेळा म्हणावे आणि दररोज १०८ वेळा “श्री राम जय राम जय जय राम” हा जप करावा.

best astrologer in pune and karad

३) शत्रूंवर मात करण्यासाठी उपासना –  

आताच्या परिस्थिती शत्रू नाही असा व्यक्ती सापडणे कठीण आहे. प्रत्येक जण आपल्या स्वार्थाचा विचार करताना दुसऱ्याचे वाईट कसे होईल ह्याचाही निष्कारण विचार करत असतो. अशी विघ्नसंतोषी माणसे आपल्याला त्रास देण्यासाठी बसलेलीच असतात. त्यांच्यावर मात करून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणे ह्यासाठी “शिवतांडव स्तोत्र” फारच उपयोगी पडते. रावणाने रचलेली हि स्तोत्ररूपी शिवस्तुती फारच सफुर्तीदायक, आणि आत्मशक्तीच्या विकास करणारी आहे. प्रबळ आत्मशक्तीच्या जोरावरच रावणाने तिन्ही लोक जिंकून घेतले होते. त्याच्या ह्या वीररसपूर्ण स्तोत्र पठणाने व्यक्तीच्या रोमारोमात उत्साह आणि लढवय्यी वृत्ती संचारते. ह्यामुळेच शत्रूला सामोरे जाऊन त्यांच्यावर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. अनेकदा नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा त्रास असतो किंवा काही उपद्रवी माणसे आपल्याला यशाचे श्रेय मिळू नये यासाठी प्रयत्न करत असतात, तर व्यवसायात प्रतिस्पर्धी निकोप स्पर्धा सोडून अन्य वाईट मार्गाने त्रास देत असतो अशा वेळेस भगवान शिवशंकराचे हे स्तोत्र शत्रूंचे दमन करण्यास साह्य करते.

best astrologer in pune and karad

उपासना एक फळे अनेक…

वरील वाक्य म्हणजे एक विशेष उपासना दर्शवते, ती म्हणजे “सद्गुरू उपासना”. जो सद्गुरूंचा होतो त्याचे भोग त्याने कसे भोगायचे, केव्हा भोगायचे आणि किती भोगायचे हे सर्व सद्गुरू ठरवतात.

shree brahmachaitanya gondavalekar maharaj
माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

मूळात गुरु हा तुमचे भोग बदलण्यासाठी नसतो तर आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवणे ह्यासाठी गुरु असतो. परंतु संसारात राहून परमार्थ करणाऱ्या साधकाला वरचेवर त्रास होत असतात अशा वेळेस ते सुसह्य होण्यासाठी, शंका न घेता, सद्गुरूंनी सांगितलेली उपासना नेटाने चालू ठेवावी. हीच ती निष्काम उपासना! गुरूंनी सांगितले आहे म्हणून करतो हा भाव महत्वाचा असतो. अशा वेळेस तुमच्या भोगांचे काय करायचे आणि फळ कसे द्यायचे हे गुरु ठरवतो. उपासनेचा हा मार्ग खडतर जरी असला तरी ह्याचे वैशिष्ठय असे कि ह्यामुळे पापकर्म करण्याचे आपल्या हातून टाळते. सद्गुरुंचे आपल्यावर सतत लक्ष राहते.

तरी सांसारिक व्यक्तीने सद्गुरूंना प्रार्थना करावी कि जे माझ्यासाठी जे चांगले असेल ते होऊ देत. जे होईल ते तुमच्या इच्छेने!

लेखन मर्यादा लक्षात घेता एवढेच सांगेन कि जशी बुद्धी असेल, आवड असेल आणि गरज असेल त्याप्रमाणे वरीलपैकी उपासनेचा अंगीकार करावा आणि आपले जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करावा.

This article is written by the best astrologer in Pune and karad, Mr. Onkar Kulkarni. To spread the knowledge, please share this post and give your feedback.

       

नोकरी आणि व्यावसायिक यशासाठी उपासना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *